Tiranga Times Maharastra —
नवीन वर्षाच्या स्वागताच्या तयारीदरम्यान थंडीचा कडाका अधिक तीव्र होत असून किमान तापमानात सतत बदल होत आहेत. राज्यातील अनेक भागांत तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले जात असल्याने नागरिकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागत आहे. उत्तर भारतात दाट धुक्याचे साम्राज्य असून अनेक भागांत इशारा जारी करण्यात आला आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवणार असून विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी आणि हवामानातील अस्थिरता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 जानेवारीपर्यंत हवामानाबाबत कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचा मोठा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
#IMDWeatherUpdate
#MaharashtraWeather
#ColdWave
#WeatherAlert
#VidarbhaWeather
#NorthMaharashtra
#WinterUpdate
#TirangaTimesMaharastra
